बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ तारखेस PUBG चे भारतात पुनरागमन?

नवी दिल्ली |  PUBGवर भारतात बंदी घालण्यात आली होती व अलिकडेच चिनी कंपनी Tencent ने भारतातले सर्व PUBG Mobile सर्वर बंद केले आहेत. त्यामुळे हा गेम युजर खेळू शकत नव्हते. मात्र रिपोर्टनूसार PUBG पुन्हा भारतात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ट्रेक क्रंचच्या मते दोन सूत्रांनी याची पुष्टी केली की, PUBG Mobile भारतात परतण्यास तयार आहे.

PUBG Mobile ची मूळ कोरियन कंपनी क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हाडर्सशी स्थानिक पातळीवर भारतात स्थानिक डेटा स्टोअर करण्यातबाबत चर्चा करीत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

गेमिंग कंपनीने भारताच्या हाय प्रोफाईल स्ट्रीमर्सना सांगितले की, वर्षाच्या अखेरीस PUBG Mobile परत येण्याची अपेक्षा करु शकता. परंतु PUBG कॉर्पोरेशननं अद्याप या संदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन जाहीर केलेले नाही.

महत्वाच्या बातम्या-

हिवाळी अधिवेशन नागपूरातच घ्या, भाजप आमदारांची मागणी

अखेर शिक्षक संघटनांच्या विरोधानंतर ऑनलाईन शाळांना ‘इतक्या’ दिवसांची सुट्टी जाहीर!

“राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळणार”

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर संधी; एकनाथ खडसे म्हणाले…

RCBचं जेतेपदाचं स्वप्न यंदाही भंगलं; हैद्राबादची बंगळूरूवर 6 गडी राखत मात

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More