FACT CHECK तंत्रज्ञान देश

भारतात PUBG गेम पुन्हा येणार?; कंपनीने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली | भारतात पब्जी गेमवर बंदी घालण्यात आली. यामुळे या गेमच्या मूळ कंपनीला याचा चांगलाच फटका बसला आहे. दक्षिण कोरियातील मूळ कंपनी पब्जी कॉर्पोरेशन आता सक्रिय झाली आहे. मंगळवारी पब्जी कॉर्पोरेशनने चीनी कंपनी Tencent Games पासून वेगळ होण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे भारतात पब्जीच्या मोबाईल व्हर्जनचा Tencent Games शी काहीही संबंध राहणार नाही. भारतातील पब्जी गेमचे सर्व हक्क हे पब्जी कॉर्पोरेशनकडे राहतील आणि ती कंपनी पब्जी मोबाईलची पब्लिशर असेल. त्यामुळे भारतातील पब्जी गेमची सर्व जबाबदारी पब्जी कॉर्पोरेशनकडे असेल.

त्याचबरोबर पब्जी कॉर्पोरेशन कंपनी म्हणाली, भारतातील सुरक्षेची चिंता लक्षात घेता आम्ही भारत सरकारसोबत मिळून या समस्येवर समाधानकारक उपाय काढण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतीय सर्व कायद्यानुसार आम्ही पब्जी गेम पुन्हा उपलब्ध करू, असंही कंपनीने म्हटलं आहे.

भारतातील पब्जीचे संगणक आणि टॅब्लेट व्हर्जनचे पब्लिशिंग पब्जी कार्पोरेशन करते. पण भारतात पब्जी मोबाईल व्हर्जनवर बंदी घातली आहे, ज्याची फ्रेंचायसी चीनी Tencent Games कडे आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

‘बाबरी तोडणारे आम्हीच आहोत’; संजय राऊतांचं कंगणाला प्रत्युत्तर

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने केला दोन लाखांचा टप्पा पार!

‘त्यासाठी माझा इतिहास पाहा’; पिंपरी-चिंचवडचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुन्हेगारांना ठणकावलं

राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस- चंद्रकांत पाटी

‘जे पेराल तेच उगवेल’; रियाच्या अटकेवर शेखर सुमनची प्रतिक्रिया

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या