बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लशींसाठी मोदींचे जाहीर आभार माना’; युजीसीची महाविद्यालयांना अजब सूचना

मुंबई | सध्या देशात अनेक ठिकाणी लसीकरण करण्यात अडचणी येत आहेत. काही लोक आताही लसीच्या दुसऱ्या डोसाच्या प्रतिक्षेत आहेत, तर काही लोकांना अद्याप पहिल्या डोसही मिळालेला नाही. पण त्यातच आता लसीकरणात श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या मार्गदर्शक सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्या. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे. त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे.

‘देशातील 18 वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार’, असा उल्लेख असलेला फलक लावण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्थांना दिले आहेत. यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्याबाबतचा फलक लावण्याचे निर्देश देतानाच हे फलक समाजमाध्यमांमध्येही प्रसारित करण्यास सांगितले आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंग्रजी आणि हिंदीतील फलकाबाबतचे स्वरूप ठरवून दिले आहे. या संदेशासोबतच्या चित्रामध्ये ‘धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी’ असं लिहिलं आहे. यूजीसीच्या या सूचनेवरून शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी संघटना आणि काही राजकीय पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अनेक विद्यार्थी संघटनेनं याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

दरम्यान, श्रेयवादाच्या लढाईत भाजप नेहमी आक्रमक भूमिका घेते. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उद्धाटनावेळी भाजपने विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये पोस्टरबाजी केली होती. त्यावेळी देखील मोठा वाद रंगला होता.

थोडक्यात बातम्या-

“महाविकास आघाडी सरकार हे शिवशाही सरकार नसून बेबंदशाही सरकार”

“सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुख यांचा थेट संबंध नाही”

‘इंधन दरवाढीसाठी काँग्रेस जबाबदार’; पेट्रोलियम मंत्र्यांचा गंभीर आरोप

कडक सॅल्युट! बोट तुटलं तरीही ‘तो’ सामना खेळायला मैदानात उतरला

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास भाजप सरकार जबाबदार – नाना पटोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More