Public Warning l नागरिकांसाठीअत्यंत महत्वाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्याने जनतेला एक आवाहन केलं आहे. खासगी माहितीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून आपला मोबाईल नंबर हॉटेल किंवा शॉपिंग मॉलमध्ये देऊ नका असं आवाहन जनतेला करण्यात आलं आहे. त्यामुळे पुणेकरांनी सावधगिरी बाळगावी आणि आपल्या खासगी माहितीचा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घ्यावी.
नागरिकांनो मोबाईल नंबर देऊ नका :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सोमवारी १९ ऑगस्टला पुणे जिल्हा पुरवठा कार्यालयाने एक परिपत्रकार जारी केलं आहे. या परिपत्रकामधे सांगण्यात
आले की, कोणत्याही व्यक्तीला पूर्व कल्पना दिल्याशिवाय त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक शेअर करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश तावरे यांनी माहिती दिली आहे.
तसेच पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश तावरे यांनी सध्या सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून फोन क्रमांकाचा चुकीचा वापर केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना हा इशारा दिला आहे. याशिवाय अनेकांचे मोबाईल नंबर हे त्यांच्या बँक खात्यांशी लिंक असतात. त्यामुळे या फोन क्रमांकाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांना बरीच माहिती असते. त्यामुळे फोन क्रमांकाच्या माध्यमातून एखाद्याचं बँक खात रिकामं केलं जाऊ शकतं.
Public Warning l असं केल्यास मिळेल मोठी शिक्षा :
पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना कोणतीही कल्पना न देता त्यांचे मोबाईल नंबर कोणालाही पुरवत असतील तर अशा अस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार ही थेट कारवाई केली जाऊ शकते आणि त्यामध्ये तब्बल 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाखांचा दंड अशा शिक्षेची तरतूद देखील होऊ शकते.
आजकाल शॉपिंग मॉल, रेस्टोरंट रिटेल दुकानदार हे ग्राहकांचे फोन नंबर घेत आहेत. यासाठी दुकानदार देखील वेगवेगळी कारणं नागरिकांना देतात. मात्र यामागे मोठा डेटा बेस तयार करण्याचा छुपा हेतू दुकानदारांचा असतो. अशाप्रकारे मोठ्या संख्येनं गोळा केलेली अशी माहिती बऱ्याचदा मुद्दाम सायबर गुन्हेगारांना देखील पुरवली जाते. या माहितीच्या आधारे हे सायबर गुन्हेगार फसवणूक करुन लोकांना लुबाडतात, असं दिनेश तावरे यांनी म्हटलं आहे.
News Title : Public Warning Against Sharing Phone Number
महत्त्वाच्या बातम्या-
पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ तारखेला पाणी पुरवठा बंद राहणार?
पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ, बड्या नेत्याच्या घरावर ईडीचे छापे
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांना थेट सूचना, म्हणाले… ‘आरोपीला…’
केकेआरचा तुफानी फलंदाज आरसीबीमध्ये जाणार? काय आहे यामागचं कारण