मुंबई | दिलेली वचनं तुम्ही न पाळून लाखो जनतेला फसवलं आहे. ही शोभणारी गोष्ट नाही. राजे जनताच आता तुम्हाला शिक्षा करेल, अशा शब्दात श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक भारत पाटणकर यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे .
विधानसभा आणि सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने श्रमिक मुक्ती दलाची भूमिका जाहीर करण्यासाठी डॉ पाटणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
जनतेला तुम्ही म्हणाला होता की, हा मोदी कोण? कोण लागून गेला? त्याला घाबरायचं काय काम आमच्याकडे मोदी पेढे वाला आहे, पण आता पेढे वाला नाही का? पंधरा लाख दिले नाहीत, नोटाबंदी ने उद्योग बंद पडले, हे सगळं तुम्ही विसरून गेलात का?, असं म्हणत पाटणकर यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे.
भाजपा शिवसेना पक्ष हुकूमशाही पद्धतीचा जातिवाद, धर्मांध, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना पाठीशी घालणारी आहे. त्यामुळे आता त्यांचा पराभव करून जनतेच्या लोकशाही ची अंमलबजावणी करण्यासाठी नवं सरकार निर्माण केलं पाहिजे, असं भारत पाटणकर यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या-
धीरज यांच्या भाषणाने सगळं देशमुख कुटुंब गहिवरलं! उपस्थितांच्या डोळ्यात पाणी https://t.co/Qyb1TsMXYc @MeDeshmukh #विधानसभा2019
— थोडक्यात (@thodkyaat) October 6, 2019
“सदस्य काँग्रेसच्या प्रचार मात्र भाजपचा; अंकिता पाटलांवर लवकर कारवाई करा”- https://t.co/ws7KB0EHbl @ankitahpatil111 @111rushi
— थोडक्यात (@thodkyaat) October 6, 2019
“शरद पवार आता राष्ट्रवादीची दोन अंकी संख्या वाचवण्याच्या प्रयत्नात”- https://t.co/vlJMP0VKNF @ChDadaPatil @PawarSpeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 6, 2019
Comments are closed.