बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोरांनो तयारीला लागा! पोलीस भरतीची तारीख जाहीर, वाचा संपूर्ण माहिती

पुणे | कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्ष भरती प्रक्रिया रखडली होती. अशातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना केंद्र सरकारने राज्यांना भरती प्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. शहरातील पोलीस दलातील 214 जागांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांची लेखी परीक्षा येत्या 5 ऑक्टोबरला शहरातील विविध केंद्रावर होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

मागील काही वर्षात झालेल्या भरती प्रक्रियेत बराच घोळ झाल्याचा दिसून आलं होतं. त्यामुळे यंदा पोलीस पदाच्या परीक्षा स्वतंत्र खासगी संस्थेकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील पोलीस दलातील 214 रिक्त जागांसाठी तब्बल 39 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

पुणे शहरातील पोलीस पदाच्या लेखी परिक्षेसाठी प्रवेशपत्र उमेदवारांना ई-मेलद्वारे पाठवण्याची प्रक्रिया येत्या बुधवारपासून सूरू होणार आहेत, लेखी परिक्षासाठी उमेदवारांनी ओळखपत्र काळजीपूर्वक केंद्रावर घेऊन यावं, त्याशिवाय परीक्षेला बसू दिलं जाणार नाही, असं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं आहे.

लेखी परिक्षासाठी उमेदवारांना प्रवेश पत्र  http://mahapolicerecmahaitexam या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील 143 केंद्रावर या पदासाठी परिक्षा होणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी विहित ओळखपत्रासह केंद्रावर उपस्थित राहावे. उमेदवारांना काही अडचणी असल्याच शहर नियंत्रण कक्षाशी त्याचबरोबर 9699792230 / 8999783728  किंवा 9309868270 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पोलीस गु्प्ता यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

सोनू सूदच्या अडचणीत वाढ???, आयकर विभागाच्या हाती लागली ‘ती’ कागदपत्रे!

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादिवशी लसीकरणाचा नवा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ लोकांनी घेतले डोस

“शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी मागितले?”

ह्रदयस्पर्शी! ‘या’ लहानग्याची पंतप्रधान मोदींना आर्त हाक; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More