बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यूपीएससीचा अभ्यास करताना कमी दिसू लागलं, मात्र तिनं हार मानली नाही; आज देशात चर्चा!

लातूर | शुक्रवारी युपीएससीचा अंतिम निकाल जाहीर झाला. अनेकांचे डोळे या निकालाकडे लागले होते. या निकालानंतर आता देशभरातून 752 विद्यार्थी अधिकारी होणार आहेत. आपल्या बुद्धीच्या आणि सातत्यपुर्ण अभ्यासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी देखील या परीक्षेत चांगलं यश मिळवून मराठी टक्का वाढवला आहे. अशातच लातूरच्या पूजा कदम या ग्रामीण भागातील विद्यार्थीनीची चर्चा सर्वत्र होत आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा तालूक्यातील टाका गावची कन्या पूजा कदम देशात 577 व्या क्रमांकाने अवघड अशी युपीएससी परीक्षा पास झाली आहे. विशेष म्हणजे पूजा कदमने आपल्या अंधत्वावर मात करत हे यश मिळवलं. थोडक्यातला दिलेल्या मुलाखतीत पुजा कदमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रश्न- तुमचा युपीएससीकडे प्रवास नेमका कधी सुरू झाला?

मी 12 वी सायन्स केल्यानंतर ठरवलंच होतं की युपीएससी करायचं. त्यामुळे मी फर्ग्युसन महाविद्यालयात ऍडमिशन घेतलं. इथं मी पॉलिटिकल सायन्समध्ये बीए केलं. त्यानंतर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून एमए पूर्ण केलं. तेव्हाच ठरवलं होतं की मला पुढे जाऊन युपीएससी करायचंय. मात्र त्यानंतर मला थोडासा वेळ लागला. मात्र मला काही तंत्रज्ञान शिकावं लागलं.

प्रश्न- युपीएससीच्या अभ्यास करताना अंधत्वावर कशा प्रकारे मात केली?

एमएच्या पहिल्या वर्षानंतर डोळ्यांचा त्रास काहीसा वाढला होता. त्यामुळे मी वेगळं तंत्रज्ञान शिकून घेतलं. या काळात मी सेक्रेनरिंग सॉफ्टवेअर शिकून घेतलं आणि त्याचा मला पुढे फायदा झाला. त्यानंतर मी पुढे व्यवस्थित शिकू शकले.

प्रश्न- अभ्यास करताना कोणाचं मार्गदर्शन आपल्यासाठी म्हत्त्वाचं ठरलं?

मी दिल्ली आणि पुण्यात खासगी शिकवणी घेतली होती. युपीएससीचा अभ्यास तसा भरपूर असण्याने काही अडचणी येऊ लागल्या. त्यात मला शिकवणीची मदत झाली. युपीएससीमध्ये रिडींग बिटविन द लाइन यावर फोकस करावा लागतो. तेव्हा शिक्षकांचं मार्गदर्शन फायद्याचं ठरतं.

प्रश्न- तुम्ही वैकल्पिक विषय कोणता निवडला होता? आणि तुम्ही एकूण किती अटेम्ट दिले?

मी पॉलिटिकल सायन्स विषय स्पेशल होता. आधी मी 2 अटेम्प केले होते. मात्र त्यानंतर डोळ्यांची समस्या उद्भवू लागली. त्यानंतर मी 3 अटेम्प दिले. विपश्यना आणि दैनंदिनी जीवना मानवी स्वाभावाचं आकलन करणे हे माझे छंद आहेत.

प्रश्न- तुमच्या अडचणीच्या काळात तुम्ही स्वत:चं मनोबल कशा प्रकारे वाढवलं?

Life is journey of gratitude in pursuing of happiness म्हणजे आयुष्यात जी दैनंदिन संकट येतात ती आपल्याला मजबूत करण्यासाठी येत असतात. आयुष्यातील जी काही सकारात्मक घटना असतात त्या आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे आपण समृद्ध होत असतो.

प्रश्न- युपीएससी करताना कुटूंबाची कशा प्रकारे मदत भेटली?

माझे वडील प्रत्येक चढ उताराच्या काळात माझ्या सोबत राहिले. त्यांनी मला कधीच विचारलं नाही की तू अभ्यास करते की नाही. कारण त्यांचा माझ्यावर तेवढा विश्वास होता. फक्त ते विचारायचे तू व्यवस्थित आहेस ना ? बस एवढं ते मला विचारायचे.

माझे वडील शिक्षक होते. वडील 2012 साली निवृत्त झाले. आई होममेकर आहे. आम्ही चौघी बहिणी आहोत. माझ्या तिन्ही बहिणी सायन्स शाखेतून शिकल्या. एक डॉक्टर, एक इंजिनिअर आणि एक फार्मासिस्ट आहे. त्यामुळे मला माझ्या क्षेत्रात वाव भेटला.

दरम्यान, लहानपणापासूनच अभ्यासात हूशार असणाऱ्या पूजा कदमच्या या यशाने ग्रामीण भाग असणाऱ्या औसा तालुक्यात आंनदाचं वातावरण आहे. थोडक्यातकडून पूजा कदमचं अभिनंदन!

थोडक्यात बातम्या-

भारताचं ‘ते’ जुनं स्वप्न होणार लवकरच पूर्ण! जो बायडन यांच्याकडून भारताचं तोंडभरून कौतूक

भाजपा युवा मोर्चाचे राजेश टोपेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

दिल्ली पुन्हा अव्वल! भेदक गोलंदाजीने राजस्थानला 33 धावांनी धूळ चारली

‘या’ तीन राज्यांना ‘गुलाब’ चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्राला देखील अलर्ट जारी

नरेंद्र मोदींच्या संपत्तीत ‘इतक्या’ लाखांची वाढ; वाचा नक्की किती आहे संपत्ती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More