बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रावसाहेब दानवेंना शिष्य म्हणायची लाज वाटते- पुंडलिक दानवे

जालना |  रावसाहेब दानवेंना शिष्य म्हणायची लाज वाटते, असं वक्तव्य जालन्यातील ज्येष्ठ नेते पुंडलिक दानवे यांनी केलं आहे. पुंडलिक दानवे हे जालन्याचे माजी खासदार आहेत. 

शरद पवार यांनी मला संधी दिली तर वयाच्या 92 व्या वर्षी रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्यास तयार आहे, असं पुंडलिक दानवे यांनी म्हटलं आहे.

माझी आणि रावसाहेब दानवे यांची लढत झाल्यास ती गुरु-शिष्याची होणार नसून राम आणि रावण यांच्यातील असेल,असं पुंडलिक दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, रावसाहेब दानवेंनी संसदेत किती पिल्लर आहेत याचं उत्तर दिल्यास त्यांच्या विरोधात काम करणं सोडून देईन, असं देखील पुंडलिक दानवे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

विराट कोहलीची बॅट पुन्हा तळपली; वनडेमध्ये झळकावलं 41 वं शतक

काँग्रेसची दुसरी यादी तयार; नाना पटोले भाजपच्या दिग्गज मंत्र्याविरोधात लढणार?

विश्वास नांगरे पाटलांची नाशिकमध्ये एन्ट्री करताच धडक कारवाई; 117 जणांना दणका

राष्ट्रवादी म्हणते; कागदपत्रांची होते चोरी, अशी कशी ही चौकदारी…!

भाजप ‘या’ दिग्गज नेत्यांचं तिकीट कापण्याची शक्यता!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More