Pune News l पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात दिवसेंदिवस झिका व्हायरस थैमान घालतं आहे. आत्तापर्यंत पुणे शहरात तब्बल 5 गर्भवती महिलांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणे शहरातील झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल 11 वर पोहोचली आहे. त्यामुळे पुणेकरांचा टेन्शन वाढलं आहे.
पुण्यात झिका व्हायरसचे आढळले 5 रुग्ण :
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे शहरातील पाषाण, मुंढवा आणि आंबेगाव बुद्रुक या परिसरात राहणाऱ्या गर्भवती महिलांना झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून पुणे शहरातील विविध ठिकाणी सर्वेक्षण करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.
पावसाळा सुरू झाल्याने झिका व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व महानगरपालिकांनी सतर्क राहावे असे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. झिका हा एडीस डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. NIV च्या पथकाने जुलै 2012 मध्ये पुरंदर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर व परिंचे येथे भेट दिली. त्यावेळी त्यांना झिका व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता.
Pune News l ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यात जावे :
आत्तापर्यंत पुणे शहरात तब्बल 11 रुग्ण झिकाचे सापडले आहेत. याशिवाय 5 गर्भवती महिलांना देखील झिका व्हायरसची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहेत. नागरिकांना ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यात जावे. याशिवाय कोणीही ताप अंगावर काढू नये असे आवाहन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यात चिकन गुनिया, डेंगू ,झिका या गंभीर आजाराने डोके वर काढल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात सर्वेक्षण सुरू केल आहे. या सर्वेक्षणातून डबक्यांमध्ये साचलेल्या पाण्यातून झिका डासाची उत्पत्ती होऊन आजार वाढत असल्याचे समोर आल आहे. त्यामुळे नागरिकांनी साफसफाई करण्याचे आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात आलं आहे. तसेच
News Title : Pune 5 more pregnant women test positive for zika virus
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! पुण्यात भरधाव वेगाने 2 पोलिसांना चिरडलं; एकाच मृत्यू तर…
आज राज्यात कसं असणार हवामान? ‘या’ भागाला यलो अलर्ट
या राशीच्या व्यक्तींनी नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्यावी
पावसाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ भागातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
दुःखद! ऑस्कर विजेत्यानं घेतला जगाचा निरोप