पुण्यात भिषण अपघात; 3 जणांचा मृत्यू तर 8 जखमी

पुणे | पुण्यातील रस्त्यावर लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात तिन जण जागीच ठार झाले असून तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

रेल्वे प्रशासनानं हे होर्डिंग उतरवण्याचं काम ठेकेदाराला दिलं होतं. होर्डिंग काढण्याचं काम सुरू असतानाही रस्ता सुरू होता. तेथील सिग्नलवर सहा रिक्षा, दोन दुचाकी व एक कार उभी असताना अचानक होर्डिंग कोसळले.

यात वाहनानांचे बरंच नुकसान झालं आहे. प्रवासी आणि चालकांनाही जबर मारही बसला आहे. 

जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-गांधी, फुले, आंबेडकर यांच्या पाठीमागे उभे राहणारे ब्राह्मणच- महादेव जानकर

-मोदींच्या कंपन्यांवर जागतिक बँकेची बंदी

-छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे काम करा; मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना सल्ला!

-पंकजा मुंडे समर्थकांविरोधात रुपाली चाकणकर यांची पोलीस तक्रार

-बाळासाहेबांच्या स्मारकाची वीट नाही रचली; निघाले राम मंदिर बांधायला!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या