बाप, आज्यानंतर आता आईही अडचणीत; आईच्या रक्ताची चाचणी होणार

Pune Accident | पुणे पोर्श कार अपघाताबाबत (Pune Accident) आता एक नवीन माहिती समोर आली आहे. या अपघाताप्रकरणी दररोज काही ना काही नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. मात्र आता आरोपीच्या रक्त तपासणीवर संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणात त्याचे वडील, अजोबा आणि आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मात्र अशातच आरोपीच्या रक्ताचं सॅम्पल बदलून त्याजागी आईचे रक्त घेतले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलाची आई देखील अडचणीत

आरोपीच्या आईने मुलाच्या रक्तातील सॅम्पल बदलण्यासाठी सूसून रूग्णालयात आपलंच रक्त दिलं, अशी माहिती समोर आली. यासाठी डॉ. श्रीहरी हळनोर यांचा प्रमुख सहभाग होता. हळनोरनेच आईचे रक्त घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (Pune Accident)

ज्यावेळी रक्त घेण्यात आलं तेव्हा रूग्णालयात आरोपीची आई त्याठिकाणी उपस्थित होती. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांच्या अटकेनंतर त्या बेपत्ता झाल्या आहेत. सध्या पोलीस त्यांचा शोध घेताना दिसत आहेत. याप्रकरणी एक समिती देखील गठीत करण्यात आली आहे. (Pune Accident)

मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार

अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार झाल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी जे.जे. रूग्णालयाच्या अधिष्टता डॉ. पल्लवी सापळे, डॉ. गजानन चव्हाण तसेच छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांची समिती गठीत केली. बुधवारी दुपारी हा अहवाल सादर केला. सूसून रूग्णालयाचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोरांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.

ससून रूग्णालयाचे अधिष्टता डॉ. विनायक कळे यांनी याप्रकरणात गांभीर्य लक्षात न घेता संस्थाप्रमुख म्हणून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, सोमवारी 27 मे दिवशी डॉ. हळनोर आणि डॉ. तावरे यांना रक्त नमुने बदलल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत डॉ. हळनोर यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

News Title – Pune Accident About Blood Sample Big Update

महत्त्वाच्या बातम्या-

गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट झाली, लावणीला डाग लागला- डॉ. चंदनशिवे

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल, हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

‘मनुस्मृती मनातून…’; प्रकाश आंबेडकर यांनी जितेंद्र आव्हाडांना सुनावलं

डॉ. श्रीहरी हळनोरची मोठी कबुली; डॉ. अजय तावरेच्या अडचणी वाढणार

वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, धक्कादायक माहिती आली समोर