Pune Accident | पुणे अपघात प्रकरणी सध्या पोलिस कोठडीमध्ये असलेले ससून येथील डॉक्टर अजय तावरे यांच्याबद्दल ठाकरे गटाने धक्कादायक दावा केला आहे. आरोपी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी तावरे सध्या अटकेत आहेत.
अशात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत मोठा खुलासा केलाय. अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलून दुसरेच रिपोर्ट देण्यात आले. तीन लाखांमध्ये हे सर्व काही घडवून आणल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालं असल्याची माहिती आहे.
यामुळे ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरनोळ यांना अटक झाली आहे. अटक केल्यानंतर अजय तावरे याने माझ्याकडे भरपूर नावे आहेत कोणालाही सोडणार नसल्याचं म्हटलं होतं. याचाच संदर्भ देत सुषमा अंधारे यांनी डॉक्टरच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
सुषमा अंधारे यांनी यावेळी आर्यन खान तसंच ललित पाटील प्रकरणाचा संदर्भ देत म्हटलं की, आर्यन खान प्रकरणाचं पुढे काय झालं, या प्रकरणामधील महत्त्वाचा साक्षीदार असलेला प्रभाकर साहिल याचा मृत्यू झाला. पुढे ललित पाटीलही बोलले माझ्याकडे अनेक नावे आहेत. मात्र, पुढे काहीही समोर आलं नाही. आता डॉ. अजय तावरे (Pune Accident) यानेही सारखंच वक्तव्य केलंय, असं अंधारे यांनी म्हटलंय.
4 जूनला निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन.
पण तोवर डॉ अजय तावरे च्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटते. @PTI_News @ANI— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) May 29, 2024
“…बाबतचे धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन”
पुढे त्या म्हणाल्या की, “येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन. पण तोपर्यंत डॉ. अजय तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटत आहे.”, असं अंधारे यांनी म्हटलंय.
पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अजय तावरे याच्या जीविताला धोका आहे. गेल्या 10 वर्षात अजय तावरेने काय केलं हे समोर आलं पाहिजे. तावडे फक्त बल्ड सॅम्पल बदलण्यापूर्ता (Pune Accident) नाही. अजय तावरे, पल्लवी सापळे, अजय चंदनवाले आणि मंत्रालयाचा काय संबंध आहे हे समोर यायला हवं, असंही अंधारे म्हणाल्या आहेत.