पोर्शे कार अपघात प्रकरणात आणखी एक व्यक्तीची एन्ट्री;…आता असं घडण्याची दाट शक्यता

porsche Car Accident l गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कारने दोन तरुणांना चिरडल्याची दहद्दकायक घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही इंजिनिअर तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर हे प्रकरण अत्यंत खोलवर असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपीच्या आईची एन्ट्री :

सविस्तर माहिती अशी की, अल्पवयीन आरोपी अग्रवाल या तरुणाने दोघांना चिरडल्याची धक्कदायक घटना 18 मे ला घडली होती. या घटनेत दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अल्पवयीनचे वडील आणि आजोबा या दोघानांही पोलिसांनी अटक केली आहे. अशातच या बड्या बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी संपूर्ण प्रशासन धावून आलं होत. मात्र आता अल्पवयीनला मदत करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना देखील अटक करण्यात आले आह.

या अल्पवयीन अल्पवयीनमुळे सर्व कुटुंब अडचणीत आले आहे. या प्रकरणात आता त्याच्या आईची एन्ट्री झाली आहे. अल्पवयीन आरोपीच्या आईची आता पुणे पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. डॉक्टरांना धमकावल्या प्रकरणी पोलिसांकडून ही चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता या चौकशीत कोणती नवीन माहिती समोर येणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे.

porsche Car Accident l शिवानी अग्रवाल यांची चौकशीत काय समोर येणार? :

पुणे हिट अँड रन प्रकरणात या अल्पवयीन आरोपी व मुलाचे आजोबा आणि वडील पोलीस कोठडीत आहेत. आता या प्रकरणात अल्पवयीनच्या आईची देखील चौकशी सुरु असून त्यांना देखील अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण या प्रकरणात आतापर्यंत अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अल्पवयीन आरोपी अल्पवयीनच्या आजोबांनी त्यांच्याच ड्राईव्हरला हा गुन्हा आपल्या अंगावर घेण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती तपासात समोर आली होती. यासाठी वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी ड्राईव्हरला रात्रभर घरात डांबून ठेवल्याचं देखील समोर आलं आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात सुंरेंद्र अग्रवाल यांना अटक केली होती. अशातच आता पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.

News Title – Pune Accident Case, Now The Entry Of The Child’s Mother Shivani Agrawal For Threatening Doctors

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! अंधाधूंद गोळीबारात माजी नगरसेवकाचा जागीच मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

पुणे पोलिसांनी कॅफेवर टाकला छापा, अंधार करुन रंगला होता धक्कादायक खेळ

पुढील काही दिवसांत ‘या’ राशीच्या व्यक्तींना राजकारणातून गोड बातमी मिळेल

मनोज जरांगेंच्या जीवनावर आणखी एक सिनेमा येणार, तारीख आली समोर

महायुतीसाठी चिंताजनक बातमी; भाजपला पहिला धक्का महाराष्ट्र देणार?