“अजय तावरे मला दारू आणायला सांगायचे, त्यांच्यामुळे..”; पुणे अपघातप्रकरणी नवी माहिती समोर

Pune Accident Dr Ajay Tavare Serious Allegation by Ward Boy

Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघा डॉक्टरांना अटक झालीये. अशात डॉक्टर तावरेबाबत ससूनच्या वॉर्ड बॉयकडून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

ससूनला वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत असणाऱ्या नितीन सोनावणे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा मोठा खुलासा केलाय. काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय की, वॉर्ड बॉय नितीन सोनावणे यांनी तावरेबाबत सगळी हकीकतच (Pune Accident) समोर आणली आहे.

ससूनमधील वॉर्ड बॉयचा धक्कादायक खुलासा

“माझे वडील आजारी होते, त्यानंतर वडिलांना हे सोडत नव्हते. तुम्हाला इथं काम करावं लागेल. तुमच्या मुलाला करायला सांग, असं सांगून आमच्यावर दबाव आणला. मी अपंग असूनही इथं कामाला सुरुवात केली. शासनाकडे मी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मी 3 वर्षे इथं काम करतोय. अजय तावरेने मला टॉयलेट ,बाथरूम धुवायला लावले.”, असा खुलासा या वॉर्ड बॉयने केला आहे.

“माझं कुटुंब उद्धवस्त झालं आहे. मला 6 वर्षे हा त्रास सहन करावा लागला आहे. मला कामावर घ्या. माझ्यावर उपासमारीची वेळ आलीये. माझी बायकोही मला सोडून गेलीये. मी आत्मदहन करेल.”, असं इशारा नितीन सोनावणे यांनी दिल्याचं (Pune Accident) समोर आलंय.

“ब्लड टेस्टमध्ये फेरफार केल्यामुळे डॉ. तावरे अटकेत”

दरम्यान, पुणे अपघात प्रकरणी डॉक्टर तावरे सध्या अटकेत आहेत. ब्लड सॅम्पलमध्ये बदल केल्याप्रकरणी डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांना अटक करण्यात आली असून दोन्ही आरोपींच्या तपासात आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे. या अपघात प्रकरणी सध्या आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल, सुरेन्द्र अग्रवाल देखील अटकेत आहेत.

पोलिस तपासात असं उघड झालं आहे की, डॉ. अजय तावरे याचाच ब्लड रिपोर्ट बदल्याण्याचा मुख्य प्लॅन होता. या दरम्यान डॉक्टर आणि विशाल अग्रवालचे संभाषण झाल्याचे ‘सीडीआर’ (कॉल डिटेल रेकॉर्ड) वरून समोर आले आहे. मुलाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने ससूनमधील तावरेला व्हॉटसॲप कॉल केला होता. सध्या विशाल अग्रवाल आणि हा (Pune Accident) डॉक्टर दोघेही अटकेत आहेत.

News Title – Pune Accident Dr Ajay Tavare Serious Allegation by Ward Boy

महत्वाच्या बातम्या- 

इटलीतील आलिशान क्रुझवर होणार अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा; पाहा PHOTO

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं, शेतकऱ्याने ‘इतक्या’ लाखांना खरेदी केला बैल

पुणे अपघात प्रकरणात ट्विस्ट; ‘मी शांत बसणार नाही, सगळी नावं..’, अटकेत असलेल्या डॉक्टरचा मोठा इशारा

“…याचा अर्थ असा होत नाही की मी इस्लामचा स्वीकार करेल”, गौरी खानचं मोठं वक्तव्य

‘ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरच्या…’; सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .