पुणे अपघात प्रकरणात ट्विस्ट; ‘मी शांत बसणार नाही, सगळी नावं..’, अटकेत असलेल्या डॉक्टरचा मोठा इशारा

Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरणी आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. आरोपी मुलाच्या ब्लड टेस्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनमधील डॉक्टर अजय तावरे सध्या अटकेत आहेत. त्यांना 30 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अशात डॉक्टर तावरे यांनी मोठा इशारा दिला आहे. ‘मी शांत बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करणार’, असा इशारा अजय तावरे यांनी पोलीस तपासात दिल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

डॉ. अजय तावरेचा मोठा इशारा

ब्लड सॅम्पलमध्ये बदल केल्याप्रकरणी डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांना अटक करण्यात आली असून दोन्ही आरोपींच्या तपासात आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे. या अपघात प्रकरणी सध्या आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल, सुरेन्द्र अग्रवाल, अजय तावरे, श्रीहरी हळनोर, अतुल घटकांबळे अटकेत आहेत.

अशात डॉक्टर तावरे यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे (Pune Accident) हे प्रकरण अजूनच चर्चेत आलं आहे. अजय तावरे यांचं नाव यापूर्वी देखील अनेक प्रकरणात आलं आहे. आता ते अग्रवाल कुटुंबामुळे अडचणीत सापडले आहेत.

पोलिस तपासात असं उघड झालं आहे की, विशाल अग्रवालने तावरे यांना ब्लड टेस्ट बदलण्यासाठी खूपदा कॉल्स केले. ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पल संकलनादरम्यान जवळपास दोन तासांत 14 वेळा विशाल अग्रवालसोबत फोनवर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.

अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात संभाषण

विशेष म्हणजे, डॉ. अजय तावरे याचाच ब्लड रिपोर्ट बदल्याण्याचा मुख्य प्लॅन होता, अशी माहिती मिळाली आहे. या दरम्यान डॉक्टर आणि विशाल अग्रवालचे संभाषण झाल्याचे ‘सीडीआर’ (कॉल डिटेल रेकॉर्ड) वरून समोर आले आहे. मुलाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने ससूनमधील डॉ. अजय तावरेला व्हॉटसॲप कॉल केला होता. सध्या विशाल अग्रवाल आणि हा डॉक्टर दोघेही अटकेत आहेत.

मात्र, डॉक्टर तावरे यांनी सर्वांची नावं (Pune Accident) उघड करणार असल्याचा इशारा दिला असून त्यात पुढे काय होतं ते पाहावं लागेल. या प्रकरणी ठाकरे गटानेही उडी घेतली आहे. डॉक्टरच्या या इशाऱ्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी धक्कादायक दावा केलाय. तावरे यांच्या जीवाला धोका असल्याची संभावना अंधारे यांनी व्यक्त केली आहे. यामुळे या प्रकरणाला आता वेगळच वळण मिळण्याची शक्यता आहे.

News Title –  Pune Accident Dr Ajay Tavare Warn That He Will Reveal Many Names 

महत्वाच्या बातम्या- 

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी, ‘या’ सेवेत बँकेकडून मोठा बदल

सातबाऱ्यामध्ये होणार बदल, महसूल विभागानं घेतला सर्वात मोठा निर्णय

कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी माहिती, डॉक्टरनेच दिला ‘तो’ धक्कादायक सल्ला

लेकाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने डॉक्टरला… कल्याणीनगर अपघात प्रकरणी नवी माहिती उघड

प्रियांका-निकच्या वयाबद्दल प्रियांकाच्या आईने केलं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…