बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओमिक्रॉनचे रूग्ण सापडताच पुणे प्रशासन सतर्क; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे | देशासह राज्यातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे (New Varient Of Corona) रूग्ण आढळल्याने भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. डोंबिवलीत 1 तर पुण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 7 रूग्ण आढळले. 7 पैकी 6 रूग्ण हे एकाच कुटुंबातील असल्याने आता पुणे प्रशासनही सतर्क झालं आहे.

ओमिक्रॉनचा (Omicron) फैलाव रोखण्यासाठी पुणे प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. आजपासून पुण्यात टेस्टिंग आणि ट्रेसिंगला सुरूवात करण्यात येत आहे. तसेच पुण्यतील रूग्णालयांना बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचं आजपासून ट्रेसिंग आणि टेस्टिंग केलं जाणार आहे. ओमिक्रॉन प्रकारचे रूग्ण आढळून येताच जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची मोहिम हाती घेतली आहे. (Tracing And Testing In Pune)

पुण्यात आजपासून ट्रेसिंग आणि टेस्टिंग सुरू होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली आहे. तर टेस्टिंग आणि ट्रेसिंग सोबतच रूग्णालयात पुरेसे बेड, ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेशही भगवान पवार यांनी दिले आहेत. ओमिक्रॉनचा धोका बघता प्रशासनाकडून सतर्कतेची पाऊलं उचलली जात आहेत.

थोडक्यात बातम्या-

ओमिक्रॉनबाधितांच्या तब्येतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

“…आता भाजप मत मागायला दारात आल्यावर हे लक्षात ठेवा”

‘या’ महिन्यात Corona ची तिसरी लाट येणार, तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य

“देवेंद्र फडणवीस नाही तर चंद्रकांत दादांनाच घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही”

टेंशन वाढलं! नवी दिल्लीत Omicron चा पहिला रुग्ण सापडला, भारतातील रुग्णसंख्या 5 वर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More