Accident l राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच पुणे- नगर महामार्गावरील कारेगाव येथे दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एक जण ठार झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे घटना घडली आहे. अपघाताची हीधक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात :
पुणे-नगर महामार्गावर असलेल्या फलके मळा येथे दोन दुचाकींचा जोरदार अपघात झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एकी व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत संदीप नामदेव गाडीलकर (वय-३५ वर्ष रा. शिंदोडी, ता. शिरूर, जि. पुणे) असं मृत व्यक्तीच नाव आहे.
या घटनेत दत्तात्रय धुमाळ असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रय धुमाळ यांच्या डोक्याला आणि शरीरावर दुखापत झाली आहे. त्यांना जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पुणे- नगर रोडवर कारेगाव येथे भीषण अपघात, पाहा थरारक व्हिडिओ, रस्ता ओलांडताना काळजी घ्या#pune #Accident #Puneaccident pic.twitter.com/ypyfht4O5h
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) August 22, 2024
Accident l घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल :
या घटनेतील मृत व्यक्ती संदीप नामदेव गाडीलकर यांच्या कुटुंबातील विशाल बाळू गाडीलकर (वय-24 वर्ष) यांनी चालकाविरोधात पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. तसेच ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र आता घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या अपघात प्रकरणी रांजणगाव गणपती पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली असून पुढील तपास रांजणगाव पोलीस करत आहेत.
News Title : Pune Ahmednagar Highway Accident
महत्त्वाच्या बातम्या-
55 कोटी लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळणार मोठी आर्थिक मदत
Post Office ची जबरदस्त स्कीम; महिन्याला कमवा 20 हजारांपेक्षाही अधिक रुपये
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार, IMD कडून हायअलर्ट
ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 70 हजारांच्या पुढे, जाणून घ्या लेटेस्ट दर
“..तर मी स्वतः आंदोलनात उतरेल”; MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात