बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे विमानतळावरून विमानांची उड्डाण पुन्हा होणार सुरू! पण ‘या’ वेळात हवाई वाहतूक बंदच

पुणे | पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील हवाई वाहतूक गेल्या काही दिवसांपासून बंद होती. 13 दिवसांपासून बंद असलेल्या पुणे विमानतळावरून आता विमानाची उड्डाण पुन्हा सुरू होणार आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत विमानतळावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. पण उद्यापासून विमानांचं उड्डाण सुरू होत आहे.

उद्या सकाळी 8 वाजल्यापासून पुणे विमानतळावरून हवाई वाहतूक सुरू होणार आहे. विमानतळावरून दिवसा वाहतूकीला सुरूवात झाली असली तरी रात्रीच्या विमान वाहतूकीवर अजूनही बंदी आहे. रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक बंदच असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची रात्रीच्या प्रवासाची प्रतिक्षा पुढचे दोन महिने लांबणीवर गेली आहे.

विमानतळ काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती. ज्या प्रवाशांनी आधीच बुकिंग करून ठेवले होते त्यांचीही बेजारी झाली होती. त्यामुळे प्रवाशांनी पर्याय म्हणून मुंबई विमानतळाला प्राधान्य दिलं. पण आता विमानतळावरील हवाई वाहतूक सुरू होत असल्याने तिकीट बुकिंग सेवा देखील पूर्वपदावर आली आहे.

पुणे विमानतळावरील वाढती गर्दी बघता विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला. विमानतळाच्या सध्याच्या इमारतीत प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोबतच उड्डाण घेणाऱ्या आणि उतरणाऱ्या विमानांची वाढती संख्या यामुळे अत्याधुनिक सोयीसुविधांसह इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या नव्या टर्मिनलचं जवळपास 60-62 टक्के काम पुर्ण झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

…अन् वकिलांच्या ‘या’ जबरदस्त युक्तिवादामुळे आर्यनचा जामीन झाला मंजूर

“मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केलं”

सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, कावेरी रुग्णालयात दाखल

फोन टॅपिंग प्रकरणातील ‘तो’ गोपनीय अहवाल फडणवीसांनी नाही तर या नेत्यांनी उघड केला

ख्रिस्तियानो रोनाल्डो आता होणार 6 मुलांचा बाबा, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली बातमी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More