बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलीस आयुक्तांनी पुणेकरांना सोडवायला दिलंय ‘हे’ कोडं; पाहा तुम्हाला सुटतंय का!

पुणे | पोलीस म्हटलं की आपल्यासमोर खाकी वर्दी, कडक स्वभाव असं चित्र समोर दिसतं. पण गुन्हेगारीच्या वाढत्या कक्षा लक्षात घेऊन पोलिस यंत्रणा आता सोशल मीडियावर देखील अॅक्टिव झाल्या आहेत. अशातच आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोशल मीडियावर नेटकऱ्यांना एक कोडं सोडवायला दिलं आहे.

अमिताभ गुप्ता यांनी एक कोडं ट्विट केलं आहे. त्या ट्विटच्या मथळ्यात त्यांनी लिहिलंय की, अरूणला त्याच्या राघव नावाच्या मित्राकडे जायचं आहे. राघवला घरात बसून बोर झालं आहे. अरूणला त्याच्या मित्राकडे जाण्यासाठी मदत करा. तुम्हाला जर हे कोडं सुटलं तर नक्की कमेंट करा. चला बघुया तुम्हाला या कोड्यातून काय संदेश मिळतो.

या कोड्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अरुण एकतर रूग्णालयात दाखल होईल किंवा अनावश्यक असल्याने पोलिस त्याला पकडेल. आणि राघवला गाठण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. अरुण घरीच राहिला पाहिजे आणि परिस्थिती सुधारल्याशिवाय अरुणशी अक्षरशः संपर्क साधू शकणार नाही. आणि तोपर्यंत दोघांनीही घरीच राहावं, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. यावर अमिताभ गुप्ता यांनी छान कमेंट असं म्हटलं आहे.

दरम्यान, या कोड्याच्या माध्यमातून अमिताभ गुप्ता यांनी पुणेकरांना त्यांच्याच तिरकस भाषेत घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

“अजित पवार सर्जन आहेत”; पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊतांचे पुन्हा भाष्य

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी मुकेश अंबानी आले धावून; उचललं हे मोठं पाऊल!

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये काँग्रेसचा आमदार असेल- नाना पटोले

कुणाचा पगार वाढला, कुणाचा कमी?; वाचा भारतीय क्रिकेटपटूंना मिळणारा नवा पगार

“मेंदूला संसर्ग होण्यासाठी काँग्रेस नेता असणं पुरेसं असतं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More