Top News पुणे महाराष्ट्र

आयसीसच्या संपर्कात असलेल्या तरुणीचं बारामती कनेक्शन; पुण्यातून अटक

पुणे | एनआयएनं नुकतीच पुण्यात एक कारवाई करुन आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोघांना अटक केली होती. यापैकी सादिया अन्वर शेख या २२ वर्षीय तरुणीचं बारामती कनेक्शन समोर आलं आहे. या वृत्तानं बारामतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सादियाने बारामतीतील एका महाविद्यालयात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. मात्र ती महाविद्यालयात जास्त फिरकत नव्हती. गेल्या काही दिवसांपासून तिनं महाविद्यालयात येणं देखील बंद केलं होतं. ती काहीतरी चुकीच्या कामात असल्याची शंका होती, तसेच तिच्यावर पोलिसांची देखील नजर होती.

८ मार्च २०२० रोजी दिल्ली पोलिसांनी एका जोडप्याला अटक केली होती. जहानजीब साबी वाणी व हिना बशीर असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या तपासात सादियाचं नाव समोर आलं होतं. सादिया गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या संपर्कात होती.

भारतात युवकांची आयसीस संघटना बनविण्यासाठी हे सर्व जण क्रीयाशिल होते. सन २०१५ पासून सादिया IS मध्ये भरती होण्याच्या प्रकीयेसाठी सोशल मिडीयावरुन क्रियाशील होती. जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा तिचा बेत होता व जम्मू काश्मिर पोलिसांना याचा सुगावा लागला होता.

महत्वाच्या बातम्या-

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआवर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्यांना अटक

मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात, पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही- किशोरी पेडणेकर

भाजपला घोडेबाजाराची सवय आणि पैशाचा उन्मात आहे- यशोमती ठाकूर

बारावीच्या निकालात ‘या’ मुलीने मिळवलेले गुण वाचून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल!

‘येत्या दोन महिन्यात परीक्षा घेणं अशक्य’; परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या