विराट कोहलीचा संघ आयपीएलमधून बाहेर, पुण्याकडून दारुण पराभव

विराट कोहली

पुणे | बंगळुरुला पुण्याकडून 61 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या लाजिरवाण्या पराभवासोबतच विराट कोहलीच्या बंगळुरुचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलं.

पुण्यानं प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुला विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बंगळुरुला 20 षटकांमध्ये 9 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 96 धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरुकडून एकट्या विराट कोहलीने झुंज दिली. त्याने 48 चेंडूत 55 धावा केल्या.

पुण्याकडून राहुल त्रिपाठीनं 37, स्टीव्हन स्मिथनं 45 आणि मनोज तिवारीनं नाबाद 44 धावा केल्या. तर इम्रान ताहिरनं 18 धावांत 3 गडी बाद करुन बंगळुरुचं कंबरडं मोडलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या