महाराष्ट्र मुंबई

पुण्यातील ‘त्या’ कार्यकर्त्यांचा भाजपकडून शोध सुरु

मुंबई | पुण्यात भाजपच्या मेळाव्यात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील कार्यकर्त्यांचा भाजपने शोध सुरु केला आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात दोन महिलांसोबत गैरवर्तन झालं होतं. एकीचा पदर ओढण्यात आला होता, तर दुसरीचा चिमटा घेतला गेला होता.

पक्षाने या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेतली असून कार्यक्रमाला आलेल्या कार्यकर्त्यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. ते पक्षाचे कार्यकर्ते नसतील, अशी शक्यता चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत व्यक्त केली.

यासंदर्भात तक्रारदार महिलांना विचारणा करण्यात आली आहे. त्यांचा कोणावर संशय आहे असं विचारलं असता त्यांनी काहीच माहीत नसल्याचे सांगितले आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-मी शेतकऱ्यांचे मोबाईल मोफत रिचार्ज करणार ही एक अफवा!

-आझम खान लोकसभा उपाध्यक्षांना म्हणाले; “तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावेसे वाटते!”

“शरद पवार माझ्या हृदयात तर उद्धव-आदित्यचं बळ माझ्या शरीरात”

-अहिरांनी राष्ट्रवादी सोडली अन् पक्षाने लगोलग या नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड केली!

-“शरद पवार शिवसेनेत येतील असं वाटत नाही”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या