मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून २ अल्पवयीन मुलांची नग्न धिंड

पुणे | मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून २ अल्पवयीन मुलाची नग्न धिंड काढण्यात आलीय. पुण्याच्या कर्वेनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. पीडित मुलांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. 

पीडित मुलाच्या आईने यासंदर्भात वारजे पोलिसात तक्रार केल्यानंतर चौघांना अटक करण्यात आलीय. नवीन खुराणा, यश खुराणा, राजू देवाशी आणि ्प्रदीप काळोखे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.