पुणे | पुण्यातील केशवनगर भागात एक दोन मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 5 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सुभाष भांडवलकर नावाच्या व्यक्तीचे हे घर आहे. त्यांचा दुधाचा व्यवसाय असल्याने खाली गोठा होता आणि त्यांचे कुटुंबिय वरच्या मजल्यावर राहात होते. गोठ्यात असलेल्या जनावरांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, इमारत जुनी झाली होती. पालिकेने ही इमारत खाली करण्याची सूचना दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या–
-अविश्वास प्रस्तावाच्या उलटं चित्र 2019 साली दिसेल- संजय राऊत
-अटल बिहारी वाजपेयींच्या सुरक्षतेत मोठा हलगर्जीपणा
-राहुल गांधींनी मोदींना मारलेल्या मिठीवरून राज ठाकरेंचा मोदींना सवाल
-भाषणात शरद पवारांचं नाव घेतल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रोल
-विरोधकांचा पराभव ही 2019च्या निवडणुकीची झलक- अमित शहा