पुणे महाराष्ट्र

पुण्यात कॅन्टोन्मेंट हद्दीत चार दिवसांचा कडक लॉकडाऊन; फक्त दूध आणि औषधं मिळणार

पुणे | पुणे शहरात कॅन्टोन्मेंट भाग वगळता इतरत्र निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र पुण्यातील क‌ॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीत कोरोनाव्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत चार दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

24 मे ते 27 मे पर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. या चार दिवसात जीवनावश्यक वस्तूंचे दुकानही बंद राहणार आहेत. या कालावधीत फक्त दूध आणि औषधांची विक्री सुरु राहील.

सकाळी 7 ते रात्री 7 या वेळेत दूध आणि औषधांची दुकानं सुरु राहतील. तर सकाळी सात ते दहा या कालावधीत पोलिस प्रशासनाच्या मदतीने भाजीपाला उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

दरम्यान, भीमपुरा आणि नवीन मोदीखाना या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यापूर्वीचा लॉकडाऊन 16 मे ते 22 मे रोजीपर्यंत होता. आज इथे खरेदीसाठी शिथिलता आणली आहे. त्यानंतर उद्यापासून लॉकडाऊनची आणखी कडक अंमलबजावणी होणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

महत्वाच्या बातम्या-

आरबीआयचे गव्हर्नर सरकारला थेटपणे का सांगत नाहीत, की…- पी. चिदंबरम

“राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे निव्वळ नाटक, मजुरांच्या हाल अपेष्टांना काँग्रेसच जबाबदार”

“राज्य सरकारला विरोध केला तर आम्ही महाराष्ट्र द्रोही, मग केंद्राला विरोध करणारे देशद्रोही का?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या