Pune car accident | सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पुण्यात वाकड (Wakad) परिसरातील टिप-टॉप इंटरनॅशनल हॉटेल (Tip-Top International Hotel) जवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची थरारक घटना घडली. हा संपूर्ण प्रसंग एका दुसऱ्या कारच्या डॅशकॅममध्ये (Dashcam) कैद झाला असून, व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (Pune car accident)
अपघाताची संपूर्ण घटना डॅशकॅममध्ये कैद
पुणे-मुंबई एक्सप्रेसवे (Pune-Mumbai Expressway) वर झालेल्या या अपघातात एक काळ्या रंगाच्या सेडान कारने (Sedan Car) मागून भरधाव वेगाने येत दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीवरील एकाचा हेल्मेट हवेत उडून मागे पडले, तर दोघेही स्वार रस्त्यावर दूर फेकले गेले.
या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात एका जखमी व्यक्तीचे कपडे फाटल्याचे दिसते. तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला जातो आणि थोड्याच वेळात बाजूच्या दूभाजकावर जाऊन कोसळतो. घटनास्थळी उपस्थित लोक तातडीने धाव घेत जखमी व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओत दिसून येत आहे. संबंधित कारचालकावर कठोर कारवाईची मागणी आता करण्यात येत आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
समाजमाध्यमांवरील प्रतिक्रिया:
अनेक नेटकरी कारचालकाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत आहेत. “अशा बेफिकीर कारचालकांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांची गाडी जप्त करावी,” अशी मागणी लोकांनी केली आहे. काहींनी “हा अपघात पूर्णतः कारचालकाच्या चुकीमुळे झाला,” असेही मत मांडले आहे. (Pune car accident)
Location – Pune – Mumbai Highway, Near Tip Top Hotel Wakad Bridge pic.twitter.com/xcRKKVa8Jo
— Rahul Kulkarni (@RahulAsks) February 24, 2025
Title : Pune car accident High-Speed Car Crash Caught on Dashcam