मुलीला शिक्षणासाठी सोडून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

पुणे | मुलीला शिक्षणासाठी सोडून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातलाय. पुण्याच्या कात्रज बोगद्याजवळ झालेल्या कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात अख्खं कुटुंब संपलं. 

ऋषिकेश यशवंत माने (वय 20) , यशवंत पांडुरंग माने (वय 47), शारदा यशवंत माने आणि रामचंद्र कृष्णा सुर्वे (वय 71) अशी या अपघात मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत. 

साताऱ्यात मुलीला शिक्षणासाठी सोडून हे कुटुंब मुंबईला परतत होतं. मात्र ड्रायव्हरला आराम मिळावा यासाठी ऋषिकेशने गाडी चालण्यास घेतली. त्याचा गाडीवरचा ताबा सुटून हा अपघात झाल्याचं कळतंय.