Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यातील ‘या’ उड्डाणपुलाचे काम वर्षभरात संपवा; नितीन गडकरींचे सक्त आदेश

Photo Courtesy- Twitter@Mohol_murlidhar

पुणे | पुण्यातील बहुप्रतिक्षीत असलेल्या चांदणी चाैक उड्डाणपूलाचे मोठा गाजावाजा करत भूमिपूजन झाले परंतू, प्रत्यक्षात मात्र जमिन अधिग्रहनासाठी अनेक अडचणी आल्या आहेत, त्यामुळे काम प्रलंबित झाले असून 26 ऑगस्ट 2021 ला संपणाऱ्या कामाला आता जवळपास दीड वर्षाचा विलंब लागणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेत चांदणी चौकात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आणि संबंधितांना चांगलेच धारेवर धरले आणि पुढच्या एका वर्षात काम संपवण्याचे आदेश दिले आहेत. पुणे महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे चांदणी चौकात उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने दिवसरात्र काम करा पण रस्त्याचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण झाले पाहिजे असे सक्त आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराला देण्यात आले आहेत तसेच आम्ही मालपाणीवाले लोक नाही, आम्हाला काम एकदम चोख आणि व्यवस्थितच हवे असे खडेबोल त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहेत.

विशेष म्हणजे, नागपूर येथे नुकतेच निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या ठेकेदाराला हे काम मिळाल्यामुळे नागपूरच्या कामाची पुनरावृत्ती झाल्यास मी स्वतः संपूर्ण रस्ता उखडून काढील आणि पुलाच्या उद्घाटनापूर्वी मी स्वत: पुलाची पाहणी करणार असल्याचंही नितीन गडकरींनी बोलून दाखवलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनामुळे महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू!

“ठाकरे सरकारच्या नेत्यांचा वेळ कामधंदे सोडून ‘या’ गोष्टींमध्ये जातोय”

खडसेंनी दिलेला ‘तो’ इशारा खरा करुन दाखवला, भाजपला जबर धक्का!

सैराटमध्ये लंगड्याची भूमिका साकारणाऱ्या तानाजीलाही लागली लॉटरी!

Happy Birthday माँ… केक अब फीका लगता है!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या