बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे बंद! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

पुणे | पुण्यात दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात येत असतो. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचं संकट आहे. राज्यातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यात देशातील सर्वाधिक रूग्णांची नोंद झाली होती. पण, मागील वर्षासह यावर्षी कोरोनाचे नियम पाळत साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आली आहे.

यावर्षी गणेशोत्सव काळात पुण्यात संचारबंदी किंवा जमावबंदी लागू केली नव्हती. मात्र, यावर्षी गणेश विसर्जनादिवशी पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. विसर्जनादिवशी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

तज्ज्ञांकडून राज्यासह देशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी येणाऱ्या कोरोनाच्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गणेश विसर्जनादिवशी कडक निर्बंध करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पुणे शहरासह जिल्ह्यातील  कोरोनाच्या परिस्थितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची माहिती दिली आहे.

दरम्यान, कोरोना परिस्थितीच्या आढाव्या सोबतच पुणे शहरातील सिंहगड परिसरातील विकास कामांच्या आढाव्याची विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.

 

थोडक्यात बातम्या –

‘2024 ला पण तुम्हीच पंतप्रधान…’; अभिनेत्री कंगणा राणावतच्या मोदींना खास शुभेच्छा

‘…म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य केलं’; नाना पटोलेंची भाजपवर जहरी टीका

बीडमधील ह्रदयद्रावक घटना, कोरोनामुळे पतीच्या निधनानंतर पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल!

“दानवे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष होते, तेव्हा सर्व काही सुरळीत होतं”

ऐनवेळी आली ‘ती’ गुप्त खबर अन् पाकिस्तानात असलेल्या न्यूझीलंडने घेतला परतण्याचा निर्णय

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More