पुणे महाराष्ट्र

पुण्यात कोरोनाचं थैमान, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉक्टरांना या महत्त्वाच्या सूचना

पुणे | जिल्ह्यात करोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सर्व डॉक्टरांनी दक्षता घ्यावी, अशी महत्त्वाची सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत खासगी आणि शासकीय रुग्णालय व प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. साखर आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त मनपा आयुक्त रूबल अग्रवाल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, तसेच…जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, “जिल्ह्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी व शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी करोना व अन्य रुग्णांवर वेळेत उपचार करुन त्यांना मानसिक आधार देऊन वैद्यकीय सेवेविषयी विश्वास निर्माण करावा.तसेच ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविडची तपासणी करण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी कोवीडच्या रुग्णांना भरती करण्यासाठी आदेश द्यावेत.”

“शासकीय व खासगी प्रयोगशाळांमध्ये मोठया प्रमाणात कोविड-19 नमुने तपासणीसाठी येत असतात त्या नमुना तपासणीचा अहवाल वेळेत प्राप्त करुन द्यावेतसर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढवण्यावर भर द्यावा. त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक यंत्र, साहित्य कमी पडतल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी. आपणास आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याकरीता प्रशासन सहकार्य करेल”, असेही राम यांनी सांगितले.

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्रातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवला

विरोधकांनी लक्षात ठेवावं, आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच- बाळासाहेब थोरात

महत्वाच्या बातम्या-

जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी….., मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कडक सूचना

कोरोनावर मात करण्यासाठी ‘प्लाझ्मा थेरपी’ शस्त्र, वाचा या थेरपीविषयी सगळी माहिती…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या