पुण्यात काँग्रेस बॅकफूटवर?; अद्याप एकाही बड्या नेत्याची सभा नाही

पुणे | पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यास काँग्रेसने मोठा उशीर केला होता. मात्र उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या एकाही नेत्याची पुण्यात अद्याप सभा झालेली नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये यामुळे अस्वस्थता पहायला मिळत आहे.

पुणे हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र भाजपने पुण्यावर वर्चस्व मिळवल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत शहरात काँग्रेसची वाताहत झाल्याचं चित्र आहे.

आतापर्यंत पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, ही एकच काय ती जोशींना दिलासा देणारी बाब आहे.

दरम्यान, काँग्रेस भवनमध्ये फारसा उत्साह दिसत नाही. दिवसाढवळ्या याठिकाणी शुकशुकाट पहायला मिळतो. त्यामुळे काँग्रेस उमेदवार मोहन जोशी बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-‘हिंदू दहशतवाद’ शब्दावरून सुशीलकुमार शिंदेंनी देशाची माफी मागावी- विनोद तावडे

सुजयला आपल्याला ‘वॉटरमॅन’ म्हणून ओळख द्यायची आहे- देवेंद्र फडणवीस

…तेव्हापासून विनोद तावडेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; मनसेची तावडेंवर जहरी टीका

युतीच्या सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

-माढ्यातील लोकांना ‘मजबूत’ हिंदुस्थान पाहिजे की ‘मजबूर’- नरेंद्र मोदी