पुणे महाराष्ट्र

पुण्यात गेल्या 24 तासात दोघांचा मृत्यू, आकडा 66 वर

पुणे | कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनामुळे काल रात्रीपासून ते आतापर्यंत दोन पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बळींची संख्या आता 66 वर येऊन पोहोचली आहे.

पुण्यात एका 68 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत रुग्ण हा बारामतीतील रहिवासी असून त्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांना 20 तारखेला दाखल करण्यात आलं होतं.

किडणीचा आजार असल्याने डायलिसिससाठी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला गेल्या 20 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान,  पुण्यात गेल्या 24 तासात दुसरा कोरोना मृत्यू हा पर्वती परिसरात झाला. येथे एका 72 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या वृद्धाचा काल रात्री उपचारादरम्यान झाला मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचा कोविड-19 अहवाल पॉझिटिव्ह आला.

ट्रेंडिंग बातम्या-

गृहमंत्री अनिल देशमुखांनी आजीबाईंना स्वत: घातला मास्क

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंदच राहणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या