पुणे महाराष्ट्र

पुण्यात पाचव्या टप्प्यातील सवलती जाहीर, पाहा कोणत्या गोष्टी सुरु कोणत्या बंद?

पुणे | लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात पुणे शहरात सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. पाचव्या टप्प्यात पुण्यातील उद्याने, कॅब, व्यापारी क्षेत्र, खासगी कार्यालयं, मंडई, बाजारपेठा तीन टप्प्यात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नवीन आदेशात 65 ऐवजी 66 प्रतिबंधित क्षेत्रं आहेत. मात्र अनेक वस्त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. आजपासून पुण्यात उद्याने पहाटे 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. महापालिका नवीन आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व दुकाने सुरू होणार आहेत.

पुण्यात 8 जूनपासून 10 टक्के मनुष्यबळासह खासगी कार्यालये उघडता येणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत सुरू करण्याची परवानगी आहे.

पुण्यात हॉटेल, मॉल, सिनेमागृह, मंदिरे आदी. बंदच राहणार आहेत. तर इतर सर्व दुकानं 9 ते 5 वेळेत सुरु ठेवता येणार आहेत. तुळशीबाग, हॉंगकॉंग, मंडई लेन पी 1, पी 2 नुसार 5 जूनपासून सुरू होणार आहे. पुण्यातील बांधकाम व्यवसायही सुरु होणार आहे तर सलून आणि ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात आज 2287 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती?

पुण्यात आज 169 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

महत्वाच्या बातम्या-

निसर्ग परीक्षा घेतोय पण आपण ताकदीने सामना करु- उद्धव ठाकरे

असाल तुम्ही सर्वेसर्वा पण…; राज्यपालांविरुद्ध मनसे नेत्या रूपाली पाटील आक्रमक

राज्यपालांनी सरकारचा ‘तो’ आदेश फिरवला, आता नवा वाद सुरु

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या