बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आजपर्यंतची कोरोनारूग्णांमध्ये सर्वांत मोठी वाढ, परंतू दिलासादायक बातमी देखील…

पुणे | पुण्यात मंगळवारी आजपर्यंतचे सर्वांत जास्त कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरात नव्याने 164 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली झाले आहे. वाञत असलेली रूग्णसंख्या हा जरा चिंतेचा विषय असला तरी रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातून एक सकारात्मक वृत्त देखील आहे.

शहरात मंगळवारी 120 कोरोना रूग्णांनी यशस्वीरित्यो कोरोनावर मात केली. म्हणून त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये नायडू-पुणे महापालिकाचे 69, खासगी रुग्णालयातले 44 आणि ससूनमधील 5 रुग्णांचा समावेश आहे.

शहरात नव्याने 164 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली झाल्याने आता एकूण संख्या 2 हजार 737 झाली आहे. तर 120 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने बऱ्या होणाऱ्या रूग्णांची संख्या आता बरीच वाढली आहे. सध्या 1 हजार 372 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पुण्यात मंगळवारी 07 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहराची एकूण तपासणी आता 24 हजार 748 झाली असून मंगळवारी 989 स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या.

ट्रेंडिंग बातम्या-

लाॅकडाऊन 4ची घोषणा कधी होणार?, नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

महत्वाच्या बातम्या-

महात्मा गांधी स्टाईल! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १३० कोटी जनतेला केलंय हे महत्त्वाचं आवाहन

याला म्हणतात अभ्यास… मोदींच्या आकड्यासोबत पृथ्वीबाबांचा आकडा बरोबर जुळला

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; जाणून घ्या सर्व आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More