बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढ काही थांबेना, आजही आकडेवारी धडकी भरवणारी

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 4 हजार 426 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 2 हजार 107 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 35 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 7 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 645 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,59,112 इतकी आहे. तर पुण्यात 33 हजार 123 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 219 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,20,770 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 16 हजार 804 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण तरीही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पारंपारिक नृत्य करून साजरी केली होळी, पाहा व्हिडिओ

सचिन वाझेच्या अडचणीत आणखी वाढ; NIA पथकाला नदीपात्रात आढळले महत्वाचे पुरावे

मोठी बातमी!!! महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन?; मुख्यमंत्र्यांचे तयारीला लागण्याचे आदेश

रिषभ पंतच्या ‘त्या’ शॉटचा सातासमुद्रापार जलवा, न्यूझीलंडच्या बॅटसमनने मारला रिव्हर्स स्कूप, पाहा व्हिडीओ

गब्बर आणि हिटमॅन दोघंही सुपरहिट; केला ‘हा’ मोठा कारनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More