बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट; आज आढळले इतके रुग्ण

पुणे |  गेल्या अनेक दिवसांतून पुण्यात आज कोरोनाबाधित रूग्णांमध्ये मोठी घट आढळून आली आहे. सोमवारी थेट 399 नव्या रूग्णांची नोंद झाल्याने पुणेकरांमध्ये दहशत निर्माण झाली होती. मात्र आजच्या आकडेवारीने पुणेकर नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल.

पुण्यात आज दिवसभरात 106 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे. ही नोंद गेल्या 10 ते 15 दिवसांतली सर्वांत कमी आकडेवारी असलेली नोंद ठरली आहे. आज 1360 जणांच्या घशाचे स्त्राव चेकअपसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 106 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या 5533 वर पोहचली आहे.

पुण्यात आता अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या 2190 एवढी आहे. तर आज दिवसरात 184 कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी गेलेले आहेत. तर दुर्देवाने आज 11 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात 171 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 50 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सांगली जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफी योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कसाबला फासापर्यंत नेणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन

महत्वाच्या बातम्या-

“एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण, करुन दाखवा रडून नको”

खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण- देवेंद्र फडणवीस

भाजप महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू?- जयंत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More