बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जाणुन घ्या पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 4 हजार 206 रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 4 हजार 895 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 46 जणांना प्राणांना मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 1158 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,44,029 इतकी आहे. तर पुण्यात 53 हजार 326 सक्रिय रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 902 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,84,801 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 21 हजार 325 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या आदेशाचेही अंमलबजावणी शहरात काटेकोरपणे केली जात आहे.

थोडक्यात बातम्या

संचारबंदीकाळात महाराष्ट्रात दारू मिळणार की नाही?

महत्वाची बातमी! संचारबंदीकाळात वाहतुकीसाठीचे निर्बंध काय? वाचा एका क्लिकवर…

निर्बंध असतानाही कटिंगचं दुकान सुरू; पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून व्यावसायिकाचा मृत्यू

‘राज्य सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतंय’; पुण्याच्या महापौरांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

संचारबंदीकाळात नागरिकांना प्रवासासाठी पास लागणार का? पोलीस महासंचालकांनी दिलं उत्तर…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More