बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 5 हजार 395 रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 4 हजार 321 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 49 जणांना प्राणांना मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 1172 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,49,424 इतकी आहे. तर पुण्यात 54 हजार 351 सक्रिय रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 951 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,89,122 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 21 हजार 922 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या आदेशाचेही अंमलबजावणी शहरात काटेकोरपणे केली जात आहे.

थोडक्यात बातम्या –

मुलीवर झालेल्या लैगिंक अत्याचारामुळे संतापलेल्या बापाने थेट आरोपीचं घर गाठलं अन्…

मंदिरातील मूर्त्या तोडणाऱ्याला पोलिसांनी पकडलं, त्याने सांगितलेलं कारण ऐकुन पोलिसही चक्रावले

पुण्यातील तरुणीशी आधी इन्स्टाग्रामवर ओळख, त्यानंतर तिच्याच घरात घुसून केलं संतापजनक कृत्य

खळबळजनक! कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला भाजप नगरसेवकाचा मृतदेह

अबब… बाॅसने छेडल्यानंतर मुलीने केला असा प्रतिकार; व्हिडीओ पाहुन व्हाल थक्क

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More