बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

पुणे | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असताना पाहायला मिळत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत देखिल वाढ होत आहे.  महाराष्ट्र शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या कमी करण्यासाठी यश येताना दिसत असतानाच पुण्यातील कोरोनाग्रस्तांची आजची आकडेवारी ही धक्कादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 5 हजार 529 रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 6 हजार 530 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 78 जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं आहे. यातील 22 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1314 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,82,491 इतकी आहे. तर पुण्यात 51 हजार 920 सक्रिय रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 6 हजार 274 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 3,24,297 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 24 हजार 409 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने दैनंदिन लागणाऱ्या गोष्टींची दुकानं ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत फक्त 4 तास सुरू ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासोबतच या बैठकीत इतर मुद्द्यांवरही चर्चा झाली.

थोडक्यात बातम्या- 

पुण्याचं नाशिक होऊ देऊ नका- महापौर मुरलीधर मोहोळ

मुख्यमंत्र्यांचा ॲानलाईन संवाद रद्द, संपूर्ण लॅाकडाऊनसंदर्भात नवी माहिती आली समोर

“दिल्ली मरतेय, थोडीतरी लाज असेल तर राजीनामा द्या”

“कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही”

“कोरोनाची दुसरी लाट आणि त्या लाटेचं व्यवस्थापन ही मोदी निर्मित ट्रॅजेडी”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More