बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 6 हजार 679 रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 4 हजार 628 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 48 जणांना प्राणांना मुकावं लागलं आहे. तर 10 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1045 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,29,661 इतकी आहे. तर पुण्यात 52 हजार 476 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 748 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,71,437 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 24 हजार 773 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणीही शहरात काटेकोरपणे केली जात आहे.

थोडक्यात बातम्या –

“अडवानी गांधीनगरचे खासदार होते म्हणून भाजपने 6 वेळा माझं तिकीट कापलं”

मुख्यमंत्र्यांचं ठरलं; महाराष्ट्रात 8 दिवसांचा कडक लाॅकडाऊन?

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा दावा, खरं कारण समोर आल्यावर पोलिसही हादरले

आयटी कंपनीतील तरुणीला गुंगीचं औषध देऊन कॅब चालकाने केला ‘हा’ प्रकार; पुण्याला हादरवणारी घटना

“फक्त एक राजाच चांगलं शासन करू शकतो, चंगू मंगु नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More