पुण्यातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट; कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक
पुणे | संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय घट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यातील रुग्णसंख्या ही देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या होती. पण आता पुणे महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्येत घट होत असून बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. जाणुन घेऊया पुण्यातील आजची दिलासादायक आकडेवारी.
पुण्यात आज दिवसभरात 709 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 2,324 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 60 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 21 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.
पुण्यात सध्या 1291 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,65,625 इतकी आहे. तर पुण्यात 10,676 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8007 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,46,942 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 9066 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या 2 महिन्यात नव्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परंतु हळुहळु ही रूग्णसंख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होत असताना संपुर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या-
क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! आयपीएलचे सामने आता ‘या’ देशात खेळले जाणार; BCCI करणार घोषणा?
कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिल्याने पुण्यातील प्रेमीयुगुलाने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल
औरंगाबादमध्ये शेतकरी कुटुंबाला मारहाण; गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, पाहा व्हिडिओ
साखरपुडा एकीसोबत, लग्न दुसरीसोबत; जालन्यातील घटनेनं एकच खळबळ
मुलीने घरमालकाच्या मुलाला भाऊ मानून बांधली राखी, त्याच भावाने मित्रासोबत मिळून केला गँगरेप
Comments are closed.