बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढतेय, वाचा आजची आकडेवारी

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आता हळुहळु पुण्यातील कोरोना आटोक्यात येत असल्याचं दिसून येत आहे. त्याच पार्श्वभुमीवर पुण्यात लाॅकडाऊनमधुन शिथिलता देण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 384 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 858 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 39 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. त्यातील 11 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 784 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,70,311 इतकी आहे. तर पुण्यात 5,518 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8,284 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,56,509 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 5,964 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळत असतानाच आता विविध भागातील कोरोना आटोक्यात आल्याचं दिलासादायक चित्र समोर आलं आहे. त्यातच आता हळुहळु लाॅकडाऊनचे निर्बंधही शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे.

थोडक्यात बातम्या- 

धोका वाढला! महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस आजाराचा दुसरा बळी, तर इतक्या रूग्णांवर उपचार चालू

संतापजनक! भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने महिलेला शेतात नेत केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

“कोरोनावर आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी मला जामीन देण्यात यावा”

‘देवेंद्र फडणवीसांनी बनवलेला तो कायदा जर फुलप्रूफ असता तर…’; उद्धव ठाकरेंचा पलटवार

मराठा आरक्षणासाठी सरकारच्या हालचाली! राज्यपालांना निवेदन, लवकरच पंतप्रधानांना भेटणार- मुख्यमंत्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More