बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र पुण्यात आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 1165 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 4040 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 74 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 23 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1402 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,44,729 इतकी आहे. तर पुण्यात 30,836 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 7,409 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,09,484 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 11499 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘कामे वेळेत आणि दर्जेदारपणे पू्र्ण करा, अन्यथा…’; अशोक चव्हाणांनी कंत्राटदारांना भरला दम

“उत्तर प्रदेशात होऊ शकतं मग महाराष्ट्रात का नाही, लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या”

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढणार?; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता

“सरकारचं लसीकरण धोरण योग्यच, ते तज्ज्ञांनी विचार विनिमय करुन तयार केलंय”

‘कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांसाठी मोठा निर्णय’; यशोमती ठाकूर यांची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More