बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आजपर्यंत साडे पाच हजारांपेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज.. पाहा आज किती नव्या रूग्णांची नोंद

पुणे |   राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत असताना बऱ्या होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट मानल्या जाणाऱ्या पुण्यात कोरोनाग्रस्तांचे आकडे जरी वाढत असले तरी त्यातही आनंदाची आणि दिलासादायक बातमी आली आहे. आज पुण्याने बऱ्या होणाऱ्या रूग्णांचा साडे पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

पुणे शहरातील 271 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून यात नायडू-पुणे महापालिका 210, खासगी रुग्णालय 56 आणि ससूनमधील 05 रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण 5575 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात 304 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या 4 ते 5 दिवसांतला हा सर्वोच्च आकडा आहे. गेल्या आठवड्यापासून 300 रूग्णांचा टप्पा पुण्याने पार केला नव्हता. मात्र आज कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

शहरात आता अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या 2528 एवढी आहे.  214 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 43 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांसाठी अजित पवारांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज 3254 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

फडणवीसांच्या कोकण दौऱ्यावर शरद पवारांचा बारीक चिमटा, म्हणाले…

सगळं सुरळीत व्हायला 2021 उजाडणार आहे- रमण गंगाखेडकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More