बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आज रूग्णसंख्या कमी अन् डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या जास्त….!

पुणे |  गेल्या अनेक दिवसांपासून पुण्याची वाढती रूग्णसंख्या हा चिंतेचा विषय ठरला आहे. पण अशा परिस्थितीत देखील पुण्यात बरे झालेल्या रूग्णांचा आकडा देखील मोठा आहे. आज तर नव्याने नोंद झालेल्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांचा आकडा जास्त आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात 234 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. त्यामुळे पुण्याची एकूण रूग्णसंख्या आता 9890 वर जाऊन ठेपली आहे. प्रथमत: ग्रीन झोन असलेल्या अनेक वार्डात आता कोरोनाबाधित रूग्ण मिळू लागले आहेत. त्यामुळे साहजिकच पुणेकरांनी काळजी घेण्याची गरज आहे.

पुणे शहरातील 236 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून यात नायडू-पुणे महापालिका 145, खासगी रुग्णालय 86 आणि ससूनमधील 05 रुग्णांचा समावेश आहे. सध्या 234 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 41 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. शहरातील एकूण रूग्णसंख्या आता 2986 एवढी आहे.

आज महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस 108 च्या कंट्रोल रुमला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना मिळणाऱ्या सेवेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

शहरी, ग्रामीण भागात रुग्णाला लागणारा कालावधी, व्हेंटिलेटर उपलब्धतेची माहिती घेतली. 108 रुग्णवाहिका व्यवस्थापन, कॉलला दिला जाणारा प्रतिसाद, लोकेशेन ट्रेसिंग, रुग्णांचे रेकॉर्ड, रुग्णवाहिकेतील उपचार व इतर सुविधांची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी माहिती दिली. तसेच 96 टक्के रुग्णवाहिका या ऑनरोड असतात, रुग्णवाहिकेबाबत 24 तासानंतर रुग्णांचा प्रतिसाद घेण्यात येत असून शाळा व समाजामध्ये 108 रुग्णवाहिकेबाबत जनजागृती केली जात असल्याचेळी त्यांनी यावेळी सांगितले.

ट्रेंडिंग बातम्या-

करण जोहरच्या सिनेमांवर बहिष्कार टाका; सोशल मीडियावर जोरदार मागणी

जामखेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ, रोहित पवारांचा राम शिंदेंना मोठा धक्का

महत्वाच्या बातम्या-

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत फडणवीसांचा ठाकरे सरकारवर खळबळजनक आरोप

राज्यात दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी रेकॉर्ड!

सुशांतला दुय्यम लेखलं!; ‘या’ व्हिडीओमुळं ट्रोल होतायेत आलिया भट्ट आणि करण जोहर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More