Top News आरोग्य कोरोना पुणे

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात दीड हजारांहून जास्त रुग्ण आढळले!

पुणे | देशासह राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून रूग्ण उपचारानंतर बरं होण्याच्या प्रमाणात बर्‍यापैकी वाढ झालेली दिलीये. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात 1449 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आज दिवसभरात 1584 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. पुण्यात 41 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर यामध्ये 13 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. यामुळे आता पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1621 पर्यंत जाऊन पोहचला आहे.

सध्या पुणे शहरात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 69235 एवढी आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे तब्बल 52802 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. या बरं झालेल्या रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात सध्या 14812 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 735 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 445 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.

तर राज्यात आज पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने 13 हजार 408 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण 3 लाख 81 हजार 843 रुग्ण बरे झाले आहेत. सातत्याने बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.64 टक्के एवढं झालंय.

महत्त्वाच्या बातम्या-

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण

आनंदाची बातमी- मुंबईत कोरोनाचे 1 लाख रुग्ण बरे तर आज कोरोनामुक्त रूग्णांचा सर्वांत मोठा आकडा!

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या