बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात काल 110 जण कोरोनामुक्त; पाहा किती नव्या रूग्णांना झालीये कोरोनाची बाधा…

पुणे | शहरात मंगळवारी नव्याने 149 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 3 हजार 747 झाली आहे. तर 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 1 हजार 630 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मंगळावारी पुण्यात 08 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील एकूण तपासणी आता 33 हजार 795 झाली असून काल 1 हजार 459 स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या आहेत.

काल एकाच दिवसांत 110 जण जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. विविध रूग्णालयांत उपचार घेत असलेल्या रूग्णांना काल डिस्चार्ज देण्यात आला. यात नायडू-पुणे महापालिका 96, ससून 13 आणि खासगी रुग्णालयामधील 01 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्य शासनाने चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आपली नियमावली जाहीर केली आहे. त्याच दृष्टीने पुण्यात देखील आता शिथीलतेची नवी नियमावली जाहीर झाली आहे. कंटेनमेंट झोन सोडून लॉकडाऊनमध्ये देखील आता हळूहळू शिथीलता करण्याचा प्रयत्न शासन आणि प्रशासन करत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 1972 नागरिक; मुख्यमंत्र्यांची माहिती

कोरोनासोबत जगायला शिका, यावर सध्या काहीही औषध नाही- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

“एक-दोन कोरोनाबाधित आढळले तर संपूर्ण कार्यालय बंद करण्याची गरज नाही”

ग्रामीण भागात मजुरांना काम द्या, अन्यथा काय करायचे ते सांगतो – प्रकाश आंबेडकर

…म्हणून मी नरेंद्र मोदी यांना राम मानते; रामायणातील सीतेचा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More