Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यात आज 92 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज; पाहा किती रुग्ण वाढले!

पुणे |  पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हावी, यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र शहरातील रूग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाहीये. पुण्यात आज दिवसभरात 205 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे.

आज 1723 जणांच्या घशाचे स्त्राव चेकअपसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 205 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या 4603 वर पोहचली आहे.

पुण्यात आता अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या 1892 एवढी आहे. तर आज दिवसरात 92 कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी गेलेले आहेत. तर दुर्देवाने आज 07 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात 170 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 42 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे तर दुसरीकडे कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत आपण केलेल्या टेस्टिंग लॅबच्या मागणीवर सकारात्मक पावले उचलायला सुरुवात झाली असून पुणे महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ससूनमध्ये नव्याने टेस्टिंग मशीनची खरेदी केली जाणार आहे.

नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या टेस्टिंग मशीनचा फायदा पुणे शहराची टेस्टिंग क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे. याबाबतच्या तांत्रिक प्रक्रियाही वेगाने पूर्ण केल्या जाणार असून निधी राज्य सरकार आणि आपली पुणे महापालिका उभारणार असल्याची माहिती देखील मोहोळ यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

महत्वाच्या बातम्या-

‘हे यश नाही तर आमच्या सरकारने केलेली निराशा आहे’; ओमर अब्दुल्लांचं इवांका ट्रम्प यांना उत्तर

धक्कदायक! फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह

तुम्ही या विजयाचे खरे शिल्पकार असणार आहात; मुख्यमंत्र्यांचं कोरोनायोद्ध्यांना भावूक पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या