Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यात आजपर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची वाढ; एका दिवसात वाढले एवढे रुग्ण!

पुणे |   पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हावी, यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र शहरातील रूग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाहीये. पुण्यात आजपर्यंतची कोरोना रूग्णांध्ये सर्वांत मोठी वाढ झालेली आहे.

पुण्यात आज दिवसभरात 291 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे. आज 1735 जणांच्या घशाचे स्त्राव चेकअपसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 291 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या 4398 वर पोहचली आहे.

पुण्यात आता अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या 1698 एवढी आहे. तर आज दिवसरात 189 कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी गेलेले आहेत. तर दुर्देवाने आज 14 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातल्या इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना पुण्याच्या काही भागातले निर्बंध कडक करण्यात आले आहेत. आज पुण्याच्या कटेंनमेंट झोनमध्ये एका परिसराची भर पडली.

आज एकाच दिवशी 19 कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने पुण्यातील आणखी एक परिसर कंटेनमेंट घोषित करण्यात आला आहे. कोरेगाव पार्कमधील संत गाडगे बाबा वस्ती भागात एकाच दिवसांत 19 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.

ट्रेंडिंग बातम्या-

“घराचं रणांगण फक्त कौरवांनी केलं होतं आणि आज भाजपने”

कोरोनाबाबत शासनानं काहीच न करता विरोधकांना सहकार्य करायला सांगणं चुकीचं- चंद्रकांत पाटील

महत्वाच्या बातम्या-

खडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का?, खडसे म्हणतात…

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅडची सोय करा; चाकणकरांची सहकाऱ्यांना विनंती

सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांची हजेरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या