बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात काल नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त! वाचा पुण्याची कोरोना स्थिती….

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे. काल नव्याने नोंद झालेल्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

शहरात नव्याने २१२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या १२,६८६ झाली आहे. तर कालच्या दिवसभरात २५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या पुण्यातल्या विविध रूग्णालयात ४,४९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे शहरातील एकूण तपासणी आता ९०,४०६ झाली असून काल ३,२२७ स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 21 जणांता अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

दरम्यान, पुण्यात 280 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 55 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुण्यात सुरूवातीचे काही दिवस कंटेनमेंट झोनमध्ये अधिक रूग्णसंख्या मिळत होती. मात्र अनलॉकिंगला जेव्हापासून सुरूवात झाली आहे तेव्हापासून नागरिकांची पुण्याच्या इतर ठिकाणी ये जा सुरू झाल्याने आता ग्रीन झोनमध्येही रूग्णसंख्या मिळू लागली आहे त्यामुळे साहजिकच पुणेकरांनी काळजी घेण्याची गरज आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘अ‌ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती’चं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण, शरद पवारांची विशेष फेसबुक पोस्ट

सुशांतच्या दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शब्द

आणखी एक परीक्षा पुढे ढकलली, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा कहर सुरूच, वाचा काल दिवसभरातली आकडेवारी…

राजस्थानमध्ये आकाशातून पडलेल्या ‘या’ वस्तूची किंमत खरंच करोडो रुपये आहे का?

आई-बापानं शेतात काबाडकष्ट करुन पोराला शिकवलं; पोरानं तहसीलदार पद उगवलं!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More